पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करोनाः श्रद्धा-सबुरीचे सूत्र; चला होऊया भयमुक्त

इमेज
करोनाः श्रद्धा-सबुरीचे सूत्र; चला होऊया भयमुक्त करोना विषाणू संसर्ग जगभरात तांडव करत आहे. सुरुवातीला चीनमधील एक शहरापुरता मर्यादित असलेला करोना जगभरात थैमान घालेल, याची कुणीच कल्पना केली नव्हती. जागतिक पातळीवर करोना बाधित आणि करोना मृत्यूने लाखांचा आकडा ओलांडला आहे. महासत्ता, विकसित देश तर करोनासमोर हतबल होताना दिसताहेत. आरोग्य यंत्रणा सर्वात सक्षम असणाऱ्या देशांनीही करोनाचा मोठा धसका घेतला आहे. भारतातही करोना बाधितांची संख्या १२ हजारावर गेली आहे. यातील सर्वाधिक करोना बाधित महाराष्ट्रात, मुंबईत आहेत. देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा बिकट आणि गंभीर परिस्थितीत निराशा, नैराश्य येणे स्वाभाविक आहे. घरातील एखाद्या प्रसंगामुळे आपण खचतो. मात्र, हे तर देशावर आलेले मोठे संकट आहे. करोनाची भिती वाटू नये, सकारात्मकता राहावी, यासाठी काही गोष्टींचा अवलंब करण्याची, आचरण्याची नितांत आवश्यकता आहे. संकल्प, संयम आणि समर्पण. संकल्प, संयम आणि समर्पण या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. करोना मुक्त भारताचा संकल्प करणे काळाची गरज आहे. गेल्याच महिन्यात मराठी नव...

यशस्वी होण्यासाठी हा धोका पत्करायलाच हवा

यशस्वी होण्यासाठी हा धोका पत्करायलाच हवा बायबलमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्याला जे दिसतं, त्याच्या आधारे आपण मार्गक्रमण करत माही तर आपण आपल्या विश्वासाच्या जोरावर मार्गक्रमण करत असतो. प्रश्न हा आहे की, विश्वास म्हणजे काय आणि विश्वास कसा उत्पन्न होतो. यशस्वी होण्यासाठी हा धोका पत्करायलाच हवा बायबलमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्याला जे दिसतं, त्याच्या आधारे आपण मार्गक्रमण करत माही तर आपण आपल्या विश्वासाच्या जोरावर मार्गक्रमण करत असतो. प्रश्न हा आहे की, विश्वास म्हणजे काय आणि विश्वास कसा उत्पन्न होतो. विश्वास आणि आत्मविश्वासामध्ये नेमकं काय अंतर आहे? प्रत्येकात कार्य करण्याच्या अपरिमित क्षमता अंतर्भूत असतात, पण काही व्यक्ती सामान्य कामेही करु शकत नाहीत. दुसरीकडे काहीजण आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन घेऊन अशक्य कामेही शक्य करण्यात यशस्वी होतात. हे व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून आहे की, आपण काय करु शकतो आणि काय नाही. एखाद्या व्यक्तीची आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करुन घेण्याची शक्ती म्हणजेच त्याचा आत्मविश्वास होय. एक प्रश्न असा पडतो की, आपल्या आत्मविश्वास निश्त...