Lockdown 4 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्वं मॉल, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही 31 मे पर्यंत बंद राहणार आहे.
नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 31 मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्व मॉल, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही 31 मे पर्यंत बंद राहणार आहे.
लॉकडाऊन-4 मध्ये काय सुरु राहणार?
ऑनलाईन लर्निंग सुरु राहणार.
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यासा परवानगी नाही.
स्टेडियम प्रॅक्टिससाठी सुरु होणार.
सरकारी कार्यालये सुरु होणार.
सरकारी कॅन्टिन सुरु राहणार.
लॉकडाऊन-4 मध्ये काय बंद राहणार?
विमानसेवा बंद राहणार.
मेट्रो सेवा बंद राहणार.
शाळा-कॉलेज बंद राहणार.
हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार.
थिएटर, शॉपिंग मॉल, जिमही बंदच राहणार.
धार्मिक, सामाजिक कार्यंक्रमांना परवानगी नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा